अमित शाह यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे.
दिल्ली, दि. १४ : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी (१३ सप्टेंबर) एक मोठी घोषणा केली. केंद्र सरकारने अंदमान निकोबार बेटांची राजधानी पोर्ट ब्लेअरचं नाव बदललं आहे. पोर्ट ब्लेअर बंदर हे आता ‘श्री विजयपुरम’ या नावाने ओळखलं जाणार आहे. अमित शाह यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “देशाला गुलामगिरीच्या सर्व प्रतीकांपासून मुक्त करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संकल्प आहे. या संकल्पापासून प्रेरित होऊन आज गृह मंत्रालयाने पोर्ट ब्लेअरचं नाव ‘श्री विजयपुरम’ असं ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘श्री विजयपुरम’ हे नाव आपला स्वातंत्र्यलढा आणि त्यामधील अंदमान निकोबरचं योगदान दर्शवत राहील”.