IMG-LOGO
राष्ट्रीय

प्रशांत किशोर यांच्याकडून नव्या पक्षाची घोषणा

Wednesday, Oct 02
IMG

निवडणूक आयोगाने त्यांच्या नव्या पक्षाच्या नावाला मान्यता दिली आहे.

पटना, दि. २ : बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बिहारच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून नव्या राजकीय पक्षाची एन्ट्री झाली आहे. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी जन सुराज पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली आहे. तसेच त्यांनी पक्षाच्या पहिल्या नेत्याचे नावही जाहीर केले आहे. त्यांचा पक्ष बिहारमध्ये नितीश कुमार व लालू प्रसाद यादव यांना टक्कर देणार आहे. प्रशांत किशोर यांच्या टीमचं नाव जन सूराज पार्टी आणि मनोज भारती यांना जन सुराज पार्टीचे पहिले नेते बनवण्यात आलं आहे. प्रशांत किशोर यांनी मनोज भारती यांच्या नावाची पक्षाच्या कार्याध्यक्षपदी घोषणा केली आणि मार्चमध्ये निवडणुकांद्वारे नवीन अध्यक्षाची निवड केली जाईल, असे सांगितले. येत्या एक-दोन दिवसांत पक्षाची परिषद (लीडरशिप काउंसिल) स्थापन होऊन नाव जाहीर केले जाईल. प्रशांत किशोर यांच्या या घोषणेमुळे बिहारमध्ये एका नव्या पक्षाचा प्रवेश झाला आहे. प्रशांत किशोर यांनी पाटण्यातील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर ही घोषणा केली.  निवडणूक आयोगाने त्यांच्या नव्या पक्षाच्या नावाला मान्यता दिली आहे. 

Share: