राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज आणि विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी राष्ट्रपती भवनात कोविंद यांची भेट घेतली.
नवी दिल्ली, दि. १५ जानेवारी : अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी पाच लाख शंभर रुपयांचे योगदान दिले. राम मंदिर निर्मितीसाठी निधी समर्पण अभियान शुक्रवारी सुरू झाले आहे. या मोहिमेमध्ये कोविंद यांनी पाच लाख रुपयांची देणगी दिली आहे. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज आणि विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी राष्ट्रपती भवनात कोविंद यांची भेट घेतली.