IMG-LOGO
राष्ट्रीय

मन की बात : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्याचा केला उल्लेख

Sunday, Nov 29
IMG

आपली एक अतिशय प्राचीन काळातली देवी अन्नपूर्णा मातेची मूर्ती कॅनडावरून परत भारतात येतेय. ही मूर्ती जवळपास 100 वर्षांपूर्वी वाराणसीच्या एका मंदिरातून चोरून बाहेर पाठवली होती, अशी माहिती पंतप्रधान मोदींनी दिली.

नवी दिल्ली, दि. २९ नोव्हेंबर  : पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता ‘मन की बात’ रेडिओ कार्यक्रमाद्वारे संवाद साधत असतात. आज 29 नोव्हेंबर रोजी त्यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुळे जिल्ह्यातील जितेंद्र भोइजी यांचा उल्लेख केला. भोईजी यांनी कृषी कायद्याचा कसा फायदा घेतला हे पंतप्रधानांनी आपल्या मन की बातद्वारे जनतेशी संवाद साधताना सांगितले. पंतप्रधान म्हणाले, 'कायद्यात आणखी एक मोठी गोष्ट आहे. उपविभागीय दंडाधिकाऱ्याला शेतकऱ्याच्या तक्रारीचे समाधान एका महिन्याच्या आत करावे लागेल अशी तरतूद या कायद्यात आहे. आमच्या शेतकरी बंधुची समस्या दूर होणारच होती. याचे कारण म्हणजे आमच्याकडे तसे मजबूत कायदा आहे. त्यांनी तक्रार केली आणि काही दिवसांमध्येच त्यांची समस्या दूर झाली.आपल्या मका या पिकाचे राहिलेले पैसे व्यापाऱ्यांकडून मिळवण्यासाठी जितेंद्र यांना नवीन कृषी कायद्यांचा कसा फायदा झाला ते पंतप्रधानांनी नमूद केले. या कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदीनुसार शेतकऱ्यांच्या थकीत बिलांच्या समस्या सोडवण्याची जबाबदारी उपविभागीय अधिकाऱ्यांवर असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.आपली एक अतिशय प्राचीन काळातली देवी अन्नपूर्णा मातेची मूर्ती कॅनडावरून परत भारतात येतेय. ही मूर्ती जवळपास 100 वर्षांपूर्वी वाराणसीच्या एका मंदिरातून चोरून बाहेर पाठवली होती, अशी माहिती पंतप्रधान मोदींनी दिली. त्याच बरोबर पर्यटन प्रेमींसाठी जागतिक वारसा स्थळ असलेले औरंगाबाद जिल्ह्यातील अंजिठ्याच्या लेण्यांचा वारसाही डिजिटल होणार मोदी म्हणाले की, अंजिठ्याच्या लेण्यांचा वारसाही डिजिटल करण्यात येत आहे. यामध्ये अजिंठा लेण्यांची संपूर्ण झलक पाहायला मिळेल. यामध्ये डिजिटलाइज्ड आणि पुन्हा स्थापन केलेल्या कलाकृती यांच्या बरोबरच यासंबंधित दस्तऐवज आाणि अनेकांनी व्यक्त केलेल्या शब्दभावना, यांचाही समावेश असेल, असंही ते म्हणाले.

Share: