IMG-LOGO
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंच्च्याहत्तरीत; सेवा पंधरवडा साजरा होणार, मोदींचा आजचा दौरा कुठे; पहा एका क्लिकवर

Tuesday, Sep 17
IMG

पंतप्रधान मोदी भुवनेश्वरच्या सैनिक शाळेजवळील गडकाना झोपडपट्टी परिसरात जातील.

दिल्ली, दि.१६ : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज वयाची ७४ वर्षे पूर्ण करत आहेत. भाजपचे सध्याचे सर्वोच्च नेते असलेल्या मोदींचा वाढदिवस पक्षातर्फे व कार्यकर्त्यांतर्फे मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. सेवा पंधरवडा साजरा करण्यापासून ते विशेष सवलत देण्यासारखे उपक्रम कार्यकर्त्यांनी हाती घेतले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज ओडिशा दौऱ्यावर आहेत. ते 'सुभद्रा योजने'सह महत्त्वाच्या कल्याणकारी योजनांचं उद्घाटन करणार आहेत. याशिवाय ते आज भुवनेश्वरमधील गडाकाना इथं २६ लाख पीएम आवास घरांचं उद्घाटन करणार आहेत. पोलीस आयुक्त संजीव पांडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, भुवनेश्वर विमानतळावर पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी भुवनेश्वरच्या सैनिक शाळेजवळील गडकाना झोपडपट्टी परिसरात जातील. झोपडपट्टीतील वास्तव्यादरम्यान ते पंतप्रधान आवास लाभार्थ्यांशी संवाद साधण्याची शक्यता आहे. त्यानंतर सुभद्रा योजनेचा शुभारंभ करण्यासाठी ते जनता मैदानात रवाना होतील. 

Share: