IMG-LOGO
राष्ट्रीय

आरबीआयच्या रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही : दास

Friday, Aug 06
IMG

आरबीआयने रेपो रेट चार टक्के तर रिव्हर्स रेपो रेट ३.३५ टक्के कायम ठेवला आहे.

नवी दिल्ली, दि. ६ ऑगस्ट :  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक धोरण समितीच्या झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास  यांनी याबाबत माहिती दिली आहे. आरबीआयने रेपो रेट चार टक्के तर रिव्हर्स रेपो रेट ३.३५ टक्के कायम ठेवला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बसलेल्या आर्थिक फटक्यामधून अर्थव्यवस्था सावरत नाही तोपर्यंत व्यादर कायम ठेवण्याचा निर्णय ‘एमपीसी’ने द्विमासिक पतधोरण आढावा बैठकीमध्ये घेतलाय असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितलं. देशातील काही भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आणि तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने आपण सतर्क राहणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर आम्ही व्यादर न बदलण्याचा निर्णय घेतलाय असं दास म्हणाले.

Share: