२०१६ साली फ्रान्सने भारताबरोबर ३६ राफेल फायटर विमाने विक्रीचा करार केला. या करारात भ्रष्टाचार आणि पक्षपात झाल्याचा आरोप होत असून फ्रान्समध्ये आता या व्यवहाराची चौकशी होणार आहे.
नवी दिल्ली, दि. 4 जुलै : राफेल प्रकरणावरुन मोदी सरकार चांगलेच अडचणीत आले होते. राफेलच्या खरेदीमध्ये घोटाळा झाला असल्याचा दावा विरोधकांनी केला होता. दरम्यानच्या काळात भारतात राफेल फायटर विमान खरेदी व्यवहार प्रकरण शांत झाले होते; पण आता मोदी सरकारच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फ्रान्समध्ये या व्यवहारांची पुन्हा एकदा चौकशी होणार आहे.या पार्श्वभूमीवर भारतात आता पुन्हा एकदा राफेलवरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. काँग्रेस पक्षाने मोदी सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल सुरू केला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी यासंदर्भात ट्विटरवर एक सूचक ट्वीट करून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी ट्विटवरवर 'चोर की दाढ़ी…' असे लिहले आणि त्याखाली राफेल स्कॅम असे म्हटले आहे. दुसरीकडे काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी थेट पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली. फ्रान्सची वेबसाईट 'मीडियापार्ट'च्या रिपोर्टचा हवाला देत सुरजेवाला यांनी म्हटले, की रिलायन्स-दसॉल्ट डीलचे सगळे पुरावे सार्वजनिक करण्यात आले आहेत. मोदी सरकारची ही 'स्विटहर्ट डील' आता सुस्पष्ट झाली आहे. आतातरी पंतप्रधान मोदी संयुक्त संसदीय समितीला तपासासाठी परवानगी देतील का, असा रोखठोख सवाल त्यांनी केला.२०१६ साली फ्रान्सने भारताबरोबर ३६ राफेल फायटर विमाने विक्रीचा करार केला. या करारात भ्रष्टाचार आणि पक्षपात झाल्याचा आरोप होत असून फ्रान्समध्ये आता या व्यवहाराची चौकशी होणार आहे. ७.८ अब्ज युरो म्हणजे ५९ हजार कोटींच्या व्यवहाराची न्यायिक चौकशी करण्यासाठी फ्रान्समध्ये एका न्यायाधीशाची नियुक्ती करण्यात आली आहे. भारत सरकार आणि राफेलची निर्मिती करणाऱ्या डासूमध्ये झालेल्या करारात भ्रष्टाचार आणि पक्षपात झाल्याचा आरोप होत आहे, त्याची चौकशी करण्यात येईल, असे फ्रान्सच्या आर्थिक गुन्हे शाखेने सांगितले. स्वतंत्र न्यायदंडाधिकारी या प्रकरणाचा तपास करेल. अन्य घटकांबरोबर फ्रान्सचे तत्कालिन अध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांची कृती आणि निर्णयही तपासले जातील, असे फ्रेंच पब्लिकेशन 'मीडियापार्ट'नं म्हटले आहे.आम्ही हे आधीपासून सांगत होतो…फ्रान्स सरकारला प्राथमिक स्तरावर राफेल व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचे दिसले. काँग्रेस आणि राहुल गांधी आधीपासून जे सांगत होते, ते यामुळे आज सिद्ध झाले. १४ जून जून २०२१ रोजी फान्सच्या सरकारी वकिलांनी राफेल व्यवहाराच्या कागदपत्रांची तपासणी करून भ्रष्टाचार क्रोनी कॅपिटॅलिझम, चुकीच्या पद्धतीने व्यवहारावर प्रभाव टाकणे आणि राफेल निर्मितीच्या कामासाठी चुकीच्या पद्धतीने लोकांना उमेदवार बनवणे याची चौकशी सुरू केली, अशी माहिती सुरजेवाला यांनी दिली.एचएएलचा करार २४ तासांत मोडीतफ्रान्सचे तत्कालीन राष्ट्रपतींनीदेखील राफेल व्यवहारात अनिल अंबानी यांच्या कंपनीची निवड करण्यात फ्रान्सची भूमिका नसून तो मोदी सरकारचा निर्णय असल्याचे म्हटले होते. याशिवाय दसॉल्टच्या प्रमुखाने भारतात आले असताना हिंदुस्थान अॅरोनॉटिक्स लिमिटेडसोबत आपला करार झाल्याचे म्हटले. त्यानंतर २४ तासांत हा निर्णय बदलून हे काम रिलायन्सला देण्यात आले. दसॉल्ट आणि रिलायन्समध्ये करार करताना त्यातून भ्रष्टाचार विरोधी तरतुदीही हटवण्यात आल्या, असे त्यांनी सांगितले.