IMG-LOGO
राष्ट्रीय

शेतकऱ्यांसाठी राहुल गांधींचा उद्या राष्ट्रपती भवनावर मोर्चा

Wednesday, Dec 23
IMG

ब्रिटनमधील आघाडीची कंपनी असलेल्या केर्न एनर्जीने 2007 मध्ये भारतात व्यवसायास सुरुवात करताना कर महसूल बुडवल्याचा दावा केंद्र सरकारने केला होता.

नवी दिल्ली, दि. २३ डिसेंबर :  शेतकरी कायद्याविरोधात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राहुल यांच्या नेतृत्वाखाली उद्या (गुरुवारी) राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या वेळी पक्षातील अनेक मोठे नेते आणि खासदार त्यांच्यासोबत असतील. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दोन कोटी स्वाक्ष-या असणारे निवेदन राहुल सादर करणार आहेत.नवे कृषी कायदे रद्द करण्यासाठी कोविंद यांनी मध्यस्थी करावी, यासाठी काँग्रेसने संपूर्ण देशभरात स्वाक्षरी मोहीम राबवली होती. दिल्लीच्या वेशीवर गेल्या 28 दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या शेतक-यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी राहुल यांच्या नेतृत्वात काँग्रेस खासदारांचे शिष्टमंडळ संसद इमारतीजवळील विजय चौक ते राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढणार आहेत. या आंदोलनातून काँग्रेस पुन्हा एकदा शेतकरी कायद्यावरून मोदी सरकारला घेऱण्याचा प्रयत्न करणार आहे. काँग्रेसने संसदेतही इतर पक्षांसोबत या कायद्याला विरोध केला आहे. राहुल आणि इतर नेत्यांनी निषेध दर्शवण्यासाठी पंजाब आणि हरियाणात ट्रॅक्टर यात्रादेखील काढली होती. दरम्यान, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी, 25 डिसेंबर रोजी पीएम किसान निधीअंतर्गत नऊ कोटी शेतकरी कुटुंबांना 18 हजार कोटी रुपये दिले जाणार आहेत. हा निधी थेट शेतक-यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतक-यांशी दूरसंचार माध्यमातून संवाद साधतील. हा कार्यक्रम म्हणजे शेतकरी आंदोलनाला दिलेले प्रत्युत्तर असल्याचे मानले जात आहे. या कार्यक्रमाची गावागावात तयारी करण्याच्या सूचना भाजपने नेते व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. ठिकठिकाणी मोठे स्क्रीन लावून मोदींचे भाषण शेतक-यांना ऐकवले जाईल. मोदींच्या भाषणाआधी भाजपच्या पदाधिका-यांनी जमलेल्या शेतक-यांना शेती कायद्यांची माहिती देणे अपेक्षित आहे. मोदी सरकारने शेतक-यांसाठी कोणत्या योजना लागू केल्या आहेत, याची माहिती देणारे दोन पानी पत्रक तयार केले असून त्याचेही वाटप केले जाणार आहे.

Share: