IMG-LOGO
राष्ट्रीय

प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचे निधन

Thursday, Oct 10
IMG

रतन टाटा यांनीच त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली होती.

मुंबई, दि. १० : देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले आहे. मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. रतन टाटा यांच्यावर उपचार सुरु असताना इंटेसिव्ह केअर युनिटमध्ये ठेवण्यात आलं होतं. रतन टाटा यांच्या निधनामुळे संपूर्ण देशासह उद्योगविश्वावर मोठी शोककळा पसरली आहे.रतन टाटा यांनीच त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली होती.  याआधी सोमवारी रतन टाटा यांची तब्येत बिघडल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, रतन टाटा यांनी या बातम्यांना अफवा म्हणत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर लिहिलं- हे दावे निराधार आहेत. सध्या वयोमानाशी संबंधित आजारांमुळे माझी वैद्यकीय तपासणी सुरू आहे. वयोमानानुसार नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल असल्याचे व यात काळजी करण्यासारखे काहीही नसल्याचे रतन टाटा यांनी म्हटले होते.  २८ डिसेंबर १९३७ रोजी मुंबईत जन्मलेले रतन टाटा उद्योगांसह सामाजिक क्षेत्रातही काम करत आहेत. रतन टाटा हे टाटा समुहाचे संस्थापक जमशेटजी टाटा यांचे पणतू आहेत. १९९० ते २०१२ पर्यंत २२ वर्षे ते टाटा समुहाचे अध्यक्ष होते. तसेच ऑक्टोबर २०१६ ते फेब्रुवारी २०१७ दरम्यान, त्यांनी टाटा समुहाचे अंतरिम अध्यक्ष म्हणून कारभार पाहिला आहे. रतन टाटा यांनी अनेक वर्षे टाटा समुहाच्या चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख म्हणून कामकाज पाहिलं आहे.

Share: