काँग्रेसची गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत कामगिरी अतिशय वाईट झाली आहे. पक्षात यानंतरही फारसे बदल झालेले नाहीत.
नवी दिल्ली, दि. २३ ऑगस्ट : देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात अंतर्गत घडामोडी सुरू असून, पक्षाचे गेल्या वर्षभरापासून हंगामी अध्यक्षपद सांभाळत असलेल्या सोनिया गांधी यांनी पद सोडण्याची घोषणा केली असून अध्यक्षपदावरील एक वर्षाचा आपला कार्यकाळ पूर्ण झाला असल्यामुळे आता आपण अध्यक्षपद सोडणार असल्याचे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.काँग्रेसची गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत कामगिरी अतिशय वाईट झाली आहे. पक्षात यानंतरही फारसे बदल झालेले नाहीत. काँग्रेसची अतिशय मोजक्या राज्यांमध्ये सत्ता आहे. काँग्रेसच्या २३ वरिष्ठ नेत्यांनी त्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहिले आहे. मोठ्या बदलांची गरज पक्षाला असल्याचे मत त्यांनी पत्रातून व्यक्त केले असून काँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी कुटुंबाच्या बाहेरील व्यक्तीची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसमधील काही नेत्यांनी केली आहे.