उत्तर प्रदेशचा कारभार सांभाळण्याऐवजी योगींनी त्यांच्या गोरखपूर मठातच बसावे. योगींना ते पसंत नसेल तर त्यांच्यावर अयोध्येतील राममंदिर उभारणीची जबाबदारी सोपवली जावी
लखनऊ, दि. ०१ ऑक्टोबर : 'योगीजी तुम्हीही एका महिलेच्या पोटातून जन्म घेतलाय. तुम्हाला इतरांच्या बहिणी-मुलींना आपली बहिण-मुलगी समजायला हवं. तुम्ही त्यांचं संरक्षणकरू शकत नाही तर तुम्ही या पदापासून स्वत:च दूर व्हायला हवं. तुम्ही स्वत:च राजीनामा द्यायला हवा. केंद्र सरकारनं नेतृत्व परिवर्तन करावं किंवा तुम्ही करू शकत नसाल तर इथं राष्ट्रपती शासन लागू केलं जावं. उत्तर प्रदेशच्या जनतेवर दया करा' असं मायावती यांनी म्हटलंय.माझा ९९ टक्के नाही तर १०० टक्के हा विश्वास आहे की सध्याचे उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री सरकार चालवण्यासाठी सक्षम नाहीत. उत्तर प्रदेशचा कारभार सांभाळण्याऐवजी योगींनी त्यांच्या गोरखपूर मठातच बसावे. योगींना ते पसंत नसेल तर त्यांच्यावर अयोध्येतील राममंदिर उभारणीची जबाबदारी सोपवली जावी, आज सकाळी मी बलरामपूरची आणखी एक घटना बातम्यांत पाहिली ज्यानं मला हादरवून टाकलं' असंही मायावती यांनी म्हटलंय.