IMG-LOGO
राष्ट्रीय

मुस्लिमांचा अल्पसंख्याक दर्जा संपुष्टात आणावा, भाजप खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

Sunday, Dec 20
IMG

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी अनेकदा चर्चेत येणारे भाजप खासदार साक्षी महाराज पुन्हा एकदा चर्चेत आलेत. यावेळी, भारतात मुस्लिमांना दिला जाणारा अल्पसंख्यांक दर्जा संपुष्टात यावा, अशी मागणी करताना साक्षी महाराज यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय.

कानपूर, दि. २० डिसेंबर  : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी अनेकदा चर्चेत येणारे भाजप खासदार साक्षी महाराज पुन्हा एकदा चर्चेत आलेत. यावेळी, भारतात मुस्लिमांना दिला जाणारा अल्पसंख्यांक दर्जा संपुष्टात यावा, अशी मागणी करताना साक्षी महाराज यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय.पाकिस्तानची लोकसंख्या ३२ कोटी आहे. तर हिंदुस्तानात मुस्लिमांची संख्या २० कोटींपर्यंत पोहचली असून हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे मुस्लिमांना दिला जाणारा अल्पसंख्याक दर्जा तत्काळ प्रभावाने संपुष्टात आणावा. तसेच मुस्लिमांनी आता स्वतःला हिंदूंचे धाकटे भाऊ समजून चालावे आणि देशात त्यांच्यासोबत रहावे, असे विधान केले आहे. तसेच देशाच्या वाढत्या लोकसंख्येविषयी बोलताना, वाढती लोकसंख्येच्या चाचणीसाठी लवकरच संसदेत एक विधेयक सादर केले जाणार आहे. ज्या व्यक्तीला दोन पेक्षा जास्त मुले आहेत. त्यांना निवडणूक लढवण्यापासून बंदी घालण्यात येणार असल्याचे साक्षी महाराज यांनी म्हटले आहे.

Share: