‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित डॉ. हरगोविंद खुराना यांचा आज जन्मदिन. दि. ९ जानेवारी १९२२ रोजी पाकिस्तानात असणा-या ‘रायपूर’ गावी त्यांचा जन्म झाला.
युगाब्द : ५१२२भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक पौष १९ शके १९४२सूर्योदय : ०७:०९सूर्यास्त : १८:१५चंद्रोदय : ०४:०५, जानेवारी १० चंद्रास्त : १४:४१शक सम्वत : १९४२ शार्वरीचंद्र माह : मार्गशीर्षपक्ष : कृष्ण पक्षतिथि : एकादशी - १९:१७ पर्यंतनक्षत्र : विशाखा - १२:३२ पर्यंतयोग : शूल - १५:०२ पर्यंतकरण : बव - ०८:२९ पर्यंतद्वितीय करण : बालव - १९:१७ पर्यंतक्षय करण : कौलव - ०६:०४, जानेवारी १० पर्यंतसूर्य राशि : धनुचंद्र राशि : वृश्चिकराहुकाल : ०९:५५ ते ११:१९गुलिक काल : ०७:०९ ते ०८:३२यमगण्ड : १४:०५ ते १५:२८अभिजित मुहूर्त : १२:२० ते १३:०४दुर्मुहूर्त : ०७:०९ ते ०७:५३दुर्मुहूर्त : ०७:५३ ते ०८:३८अमृत काल : ०१:१०, जानेवारी १० ते ०२:३९, जानेवारी १०वर्ज्य : १६:१५ ते १७:४४प्रवासी भारतीय दिवस ९ जानेवारीला साजरा केला जातो. कारण ९ जानेवारी १९१५ मध्ये महात्मा गांधी, दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आले होते. भारताच्या विकासासाठी परदेशी भारतीय समुदायाने जे योगदान दिले आहे ते दर्शवणे हे आजचे मूळ उद्दिष्ट आहे.प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार हा परदेशी भारतीयांना दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे. अनिवासी भारतीय, भारतीय मूळ व्यक्ती, संस्थापक, संस्था किंवा अनिवासी व्यक्तींनी स्थापित केलेल्या आणि चालविणाऱ्या संस्था यांना हा पुरस्कार देण्यात येतो. हे पुरस्कार २००३ पासून आयोजित करण्यात येत आहे. भारताच्या परराष्ट्र समुदायाच्या सहभागास मजबूत करण्यासाठी आणि त्यांच्या मुळांशी पुन्हा जोडण्यासाठी हा पुरस्कार प्रत्येक २ वर्षात साजरा केला जातो.*आज प्रवासी भारतीय दिवस, अनिवासी भारतीय दिवस आहे.*‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित डॉ. हरगोविंद खुराना यांचा आज जन्मदिन. दि. ९ जानेवारी १९२२ रोजी पाकिस्तानात असणा-या ‘रायपूर’ गावी त्यांचा जन्म झाला. १९४५ मध्ये रसायनशास्त्र हा विषय घेऊन पंजाब विद्यापीठातून ते एमएस्सी झाले. १९४८ मध्ये लिव्हरपूल (इंग्लंड) येथे संशोधन कार्य करून त्यांनी पीएच.डी. पदवी संपादन केली. तेथेच अनेक विद्यापीठांतून जीवशास्त्र व रसायनशास्त्राचे अध्यापन केले. १९६६ मध्ये त्यांनी अमेरिकन नागरिकत्व स्वीकारले. जीवनशास्त्रात केलेल्या त्यांच्या संशोधनामुळे आनुवंशिकतेतील रहस्यावर खूपच प्रकाश पडला आहे. हरगोविंद खुराना हे भारतात जन्मलेले शास्त्रज्ञ आहेत. जनुकीय रचना व प्रथिनांच्या रचनेमधील त्यांची महत्त्वाची कडी शोधण्याच्या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल यांना रॉबर्ट डब्ल्यू हॉली आणि मार्शल वॉरेन निरेनबर्ग यांच्यासोबतच १९६८चे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक त्यांना मिळाले होते. भारत सरकारने १९६३ मध्येच त्यांना ‘पद्मभूषण’ किताबाने गौरविले होते. डॉ. हरगोविंद खोराना यांना १९६९ च्या जून महिन्यात निर्जीव रसायनापासून जनुके बनविण्यात यश मिळाले. जनुकातील महत्त्वाचा भाग म्हणजे डी.एन.ए. होय. त्यांच्या या संशोधन कार्याचा उपयोग शरीरातून आनुवंशिक रोगांचे उच्चाटन होऊ शकेल. त्यांच्या या शोधामुळे माणसाच्या जीवनाचे नंदनवन बनेल. *१९२२ : जन्माने भारतीय असलेले अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेतेहर गोविंद खुराना यांचा जन्म. (मृत्यू : ९ नोव्हेंबर २०११)*दिन है सुहाना आज पहली तारीख है |खुश है ज़माना आज पहली तारीख है ||पहली तारीख, अजी पहली तारीख है - कमर जलालाबादीदलसुख पांचोली तेव्हा ‘जमीनदार’ नावाच्या चित्रपटात व्यग्र होते. त्यांनी कमरविषयी ऐकले होते. ‘जमीनदार’च्या गीतलेखनाची जबाबदारी त्यांनी कमरवर टाकली. कमरने मग ‘दुनिया मे गरीबों को आराम नहीं मिलता...’ अशा आशयघन गाण्यातून सर्वांना बेचैन केले. या संधीने कमरला चित्रपटसृष्टीचे दरवाजे खुले झाले. कमर या प्रतिभावंताला मग विष्णुपंत दामले-फत्तेलाल-व्ही. शांताराम यांच्या ‘प्रभात फिल्म्स’मध्ये संधी मिळाली. ‘चाँद’ या चित्रपटाचे गीतलेखन त्यांनी केले. ‘चाँद’चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हुस्नलाल-भगतराम या पहिल्या संगीतकार जोडीने दिलेले संगीत. यातील ‘दो दिलों को ये दुनिया मिलने नहीं देती’, ‘मेरे दिलरुबा आ जा’ आणि ‘ए दिल मुझे रोने दो’ ही कमर यांची गाणी चांगलीच गाजली. नंतर ‘प्रभात’च्या अनेक चित्रपटांसाठी कमर यांनी संवाद, गीतलेखन केले. ‘प्रभात’च्या अस्तानंतर कमर यांचे सूर जुळले ते फेमस स्टुडिओशी. ओघवती शैली, सरळ-साधे परंतु काळजाला भिडणारे शब्द, भाव-भावनांना उपमांनी सजवलेला साज व त्यातून सहज लयीत गुंफलेल्या शाब्दिक फुलोऱ्यातून रसिकांच्या हृदयाला घातलेला हात हे कमर जलालाबादी या शायराचे आगळेवेगळे वैशिष्ट्य. इक दिल के टुकडे हजार हुए, कोई यहाँ गिरा कोई वहाँ गिरा, बहते हुए आँसू रुक न सके, कोई यहाँ गिरा कोई वहाँ गिरा..(प्यार की जीत) यामधली प्रेमभंगाची भावना, त्याच चित्रपटातले ओ दूर के जानेवाले वादा न भूल जाना, रोते हुई अंधेरी तुम चांद बन के आना... यामधली प्रेमाची भावना हीच तर आहे कमर यांच्या लेखणीची जादू. संगीतकार ओ. पी. नय्यर यांच्याशी कमर यांची वेव्हलेंग्थ खऱ्या अर्थाने जुळली होती. पिया पिया न लागे मोरा जिया (फागुन), मैं सोया अंखियाँ मीचे, तेरी जुल्फों के नीचे, इक परदेसी मेरा दिल ले गया (फागुन), छुन-छुन घुंगरू बोले (पतंगा), छोटा सा बलमा, मैं बंगाली छोकरा, मेरा नाम चिन-चिन चू (हावडा ब्रीज), आइए मेहेरबां बैठिए जानेजां (हावडा ब्रीज), रुक रुक कहा चली दीवानी अशा अनेक माइलस्टोन गीतरचना कमर-ओ. पी. या कॉम्बिनेशनचे प्रत्यंतर देतात. ‘ओपीं’नंतर कमर यांचे सूर जुळले ते संगीतकार कल्याणजी-आनंदजी यांच्याशी. डम डम डिगा डिगा, मौसम भीगा भीगा, छलिया मेरा नाम, मेरे टूटे हुअेय दिल से, तेरी राहों में खडे हैं (छलिया), मैं तो एक ख्वाब हूँ, इस ख्वाब से तू प्यार न कर (हिमालय की गोद में), तुम ही मेरे मीत हो (प्यासे पंछी), दीवानों से ये मत पूछो (उपकार) अशी अनेक अवीट गोडीची गाणी या कॉम्बिनेशनने दिली. ‘शहीद भगतसिंग’मध्ये सरफरोशी की तमन्ना... सारखे देशभक्तिपर गीत लिहिणाऱ्या कमर यांनी ‘हमने तेरी जफा का वफा नाम रख दिया’ (चले हैं ससुराल) असा टोकाचा भावही अनेक गाण्यांतून व्यक्त केला. *२००३ : गीतकार व कवी ओमप्रकाश भंडारी उर्फ कमर जलालाबादी यांचे निधन. (जन्म : २९ फेब्रुवारी, १९१७)*घटना :१७६० : बरारीघाटच्या लढाईत अहमद शाह दुर्रानी यांनी मराठ्यांचा पराभव केला.१७८८ : कनेक्टिकट हे अमेरिकेचे ५वे राज्य बनले.१८८० : क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना राजद्रोहाच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि त्यांना तेहरान जहाजाने एडनला नेण्यात आले.१९१५ : महात्मा गांधी अफ्रिकेतुन भारतात आले.२००१ : नव्या सहस्त्रकातील पहिल्या महाकुंभमेळ्याला अलाहाबाद येथे प्रारंभ झाला.२००१ : नव्या सहस्रकातील पहिले खग्रास चंद्रग्रहण दिसले.२००२ : भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंड विरूद्ध एकदिवसीय मालिका जिंकली.२००७ : स्टीव जॉब्स यांनी पहिला आयफोन प्रकाशित केला.मृत्यू :१९२३ : पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS) सत्येंद्रनाथ टागोर यांचे निधन. (जन्म : १ जून, १८४२)२००४ : पखवाज वादक शंकरबापू आपेगावकर यांचे निधन.जन्म :१९१८ : मार्क्सवादी विचारवंत लेखक प्रभाकर उर्ध्वरेषे यांचा जन्म.१९२७ : सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक आणि समीक्षक रा. भा. पाटणकर यांचा जन्म. (मृत्यू : २४ मे, २००४)१९३४ : पार्श्वगायक महेंद्र कपूर यांचा जन्म. (मृत्यू : २७ सप्टेंबर २००८)१९५१ : ख्यालगायक व पं. कुमार गंधर्व यांचे पट्टशिष्य पं. सत्यशील देशपांडे यांचा जन्म.१९६५ : नृत्यदिग्दर्शक फराह खान यांचा जन्म.