अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या लालकृष्ण आडवाणींना गेल्या काही दिवसांपासून आरोग्यविषयक तक्रारींचा सामना करावा लागतो आहे.
दिल्ली, दि. ७ : माजी उपपंतप्रधान आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना नवी दिल्लीतल्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती स्थिर आहे. अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या लालकृष्ण आडवाणींना गेल्या काही दिवसांपासून आरोग्यविषयक तक्रारींचा सामना करावा लागतो आहे. याच वर्षी लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरवण्यात आलं. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ३० मार्च २०२४ या दिवशी लालकृष्ण आडवाणी यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन हा पुरस्कार दिला. लालकृष्ण अडवाणी यांना जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांना न्यूरोलॉजी डिपार्टमेंटमधील वरिष्ठ डॉक्टर विनित सुरी यांच्या देखरेखीमध्ये काही दिवस ठेवण्यात आले होते.