लंडन अहमदाबाद फ्लाइटमध्ये 275 प्रवासी होते. त्या सर्वांची कोरोना चाचणी विमानतळावरच करण्यात आली. बाधितांना अहमदाबादच्या एसव्हीपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दिल्ली, दि. २२ डिसेंबर : भारतात आलेल्या प्रवाशांची काटेकोट तपासणी होत आहे आणि त्यातून दिल्लीला आलेल्या पाच प्रवाशांना कोरोनाची बाधा झाली आहे, तर कोलकात्याला आलेले दोन प्रवाशीसुद्धा कोरोनाबाधित असल्याची माहिती आहे. लंडन दिल्ली फ्लाइटमध्ये 275 प्रवासी होते. त्या सर्वांची कोरोना चाचणी विमानतळावरच करण्यात आली. बाधितांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.