IMG-LOGO
शेती

शेतकरी विरोधी विधेयक रद्द करावं, शरद पवारांनी केला अन्नत्याग

Tuesday, Sep 22
IMG

विधेयक संमत करून घेण्यसाठी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी सभागृहाच्या कामकाजाची वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला.

मुंबई, दि. २२  सप्‍टेंबर :  संसदेच्या पावसाळी अधिवेशनच्या सातव्या दिवशी राज्यसभेत कृषि विधेयके मांडण्यात आली. संसदेच्या वरिष्ठ सदनात विधेयकावर चर्चेनंतर कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी उत्तर दिलं. तोमर हे उत्तर देत असताना विरोधकांनी मात्र राज्यसभेत जोरदार गोंधळ घातला. या गोंधळातच कृषि विषयक विधेयके राज्यसभेतही मंजूर झाले आहेत. आवाजी मतदानाने हे विधेयके राज्यसभेत मंजूर करण्यात आले आहे.विधेयक संमत करून घेण्यसाठी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी सभागृहाच्या कामकाजाची वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला. उपसभापतींच्या निर्णयावर खासदारांनी जोरदार आक्षेप घेत सभागृहात तोडफोडही केली. खासदारांनी सभागृहातच नियम पुस्तिका फाडली तसेच माईकही तोडण्यात आला. सदस्यांनी चहाला हात लावला नाही हे बरंच झालं. आज सदस्यांनी अन्नत्याग केला. मीही आज दिवसभर अन्नत्याग करणार आहे. त्यांच्या अभियानात मी सहभागी होणार आहे," असं शरद पवार म्हणाले आहेत. यामुळे आता केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला विरोध कायम ठेवला असून या विधेयकाच्या राज्यसभेतील घडामोडींवेळी हजर नसलेल्या शरद पवार यांनी देखील आपली भूमिका जाहीर केल्याने राजकारण चांगलंच तापलं आहे.

Share: