IMG-LOGO
राष्ट्रीय

बिगर भाजप राज्यांशी केंद्राचा भेदभाव

Saturday, Apr 17
IMG

दुसर्‍या देशांना मदत करून आपण किती उदार आहोत, हे दाखवण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करत आहे.

सोनिया गांधी यांचा आरोप; पंतप्रधान मोदींना लिहिले पत्रनवी दिल्ली, दि. १७ एप्रिल : देशभरात कोरोनाचे संकट वाढले असून अनेक राज्यांमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काँग्रेस कार्यकारी समितीची बैठक बोलावून त्यात देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी केंद्रातील मोदी सरकार बिगर भाजपशासित राज्यांशी भेदभाव करत असल्याचा आरोप केला. दरम्यान, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या बहिण-भावानेही केंद्र सरकार तसेच मोदी यांच्यावर टीकास्त्र डागले काँग्रेसचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या सहयोगी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अनेकदा पत्र लिहून आवश्यक साधनसामुग्री मागितली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी यांना लिहिलेल्या पत्रानंतर सोनिया यांनी बैठक बोलवून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी मोदी यांना पत्र लिहिले असून, त्यात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या मागण्यांबाबत केंद्र सरकार मौन बाळगते आहे. अनेक राज्यांमध्ये लसी नाहीत. व्हेंटिलेटर नाही. ऑक्सिजन नाही. बिगर भाजपशासित राज्यांना मदत दिली जात नाही; मात्र भाजपची सत्ता असलेल्या राज्यांना प्राधान्याने मदत केली जात आहे, असा आरोप सोनिया यांनी केला. दुसर्‍या देशांना मदत करून आपण किती उदार आहोत, हे दाखवण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. दुसरीकडे आपल्याच देशात हजारो लोक लस मिळत नसल्याने मरत आहेत, असा आरोप करून रेमडेसिवीर रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाची असताना रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनवर 12 टक्के जीएसटी का वसूल केला जात आहे, असा सवाल त्यांनी केला. ऑक्सिमीटर आणि व्हेंटिलेटरवरही 20 टक्के जीएसटी का वसूल केला जात आहे, अशी विचारणा सोनिया यांनी केली. कोरोनासंबंधित सर्व साहित्य जीएसटीमुक्त ठेवण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. तसेच 25 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस देण्यात यावी, तसेच कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांनाही लस देण्याची मागणी त्यांनी केली. टाळेबंदी आणि आर्थिक निर्बंधामुळे अडचणीत आलेल्या नागरिकांना केंद्र सरकारने प्रत्येकी सहा हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. तसेच मजुरांना आपल्या राज्यात जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्याची आणि या मजुरांचे पुनर्वसन करण्याची मागणीही केली आहे.कोरोना संक्रमित रुग्णांचे दररोज नवनवीन रेकॉर्ड प्रस्थापित करणारे आकडे आणि कोरोनामुळे होणारे मृत्यू यांवरून काँग्रेसकडून मोदी सरकारकडून हल्ला करण्यात आला. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि महासचिव प्रियांका गांधी यांनी सोशल मीडियावरून मोदी सरकारला निशाण्यावर घेतले. ’थक्क करणारी गोष्ट म्हणजे, भारतात कोरोना संक्रमणाचा प्रभाव वाढत असताना, गेल्या 70 वर्षांतील सरकारची मेहनत पाण्यात घालत एकेकाळचा लस ’निर्यातक’ देश आता लसीची आयात करणारा देश बनला. मोदी हे असे पाटलट आहेत, ज्यांनी आपात्कालीन परिस्थितीतून सहजगत्या बाहेर पडण्यासाठी केवळ बोर्डिंग पासवर आपला फोटो लावला’ असे ट्विट प्रियंका यांनी केले.मोदींनी करून दाखविले!’स्मशान आणि कब्रस्तान दोन्ही... जे म्हटले ते करुन दाखवले,’ अशा उपरोधिक शब्दांत राहुल यांनी मोदी यांच्यावर टीका करताना ’मोदी मेड डिजास्टर’ (मोदी रचित आपत्ती) असा हॅशटॅगही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये जोडला.

Share: