IMG-LOGO
राष्ट्रीय

ऑगस्टपासून भारतात स्पुटनिकचे उत्पादन सुरू होणार

Saturday, May 22
IMG

देशात या वर्षी स्पुटनिक-व्हीचे 85 कोटीहून अधिक डोस तयार केले जातील.

नवी दिल्ली, दि. २२  मे :  भारतात लसीकरणाच्या मोहिमेत आता रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचा समावेश झाला आहे. नागरिकांना लवकरच रशियाची स्पुटनिक-व्ही लस दिली जाणार आहे. या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून देशात स्पुटनिकचे उत्पादन सुरू होणार आहे, अशी माहिती रशियामधील भारताचे राजदूत डीबी वेंकटेश वर्मा यांनी दिली आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत भारताला स्पुटनिकच्या 30 लाख डोसचा पुरवठा करण्यात येणार आहे. जून महिन्यात 50 लाख डोसांचा पुरवठा होण्याची अपेक्षा आहे. देशात या वर्षी स्पुटनिक-व्हीचे 85 कोटीहून अधिक डोस तयार केले जातील.

Share: