IMG-LOGO
राष्ट्रीय

Maratha Reservation : मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Wednesday, Dec 09
IMG

हे प्रकरण गंभीर आहे आणि मोठे आहे त्यामुळे विस्तृत सुनावणी जानेवारी महिन्यात केली जाईल असे या घटनापीठने म्हटले आहे. पाच न्यायमुर्तींच्या घटनापीठापुढे आज सुनावणी पार पडली.

नवी दिल्ली, दि. ९ डिसेंबर : मराठा आरक्षण प्रकरणी ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा झटका बसला आहे. मराठा आरक्षणाला खंठपीठाने दिलेली अंतरिम स्थगिती हटवण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने नकार दिला आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने बाजू मांडताना वकिलांनी विविध खटल्याची उदाहरणं देत अंतरिम स्थगिती उठवण्याची मागणी केली. मात्र ही स्थगिती तूर्तास हटवली जाणार नाही, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं. आता पुढील सुनावणी पुढील वर्षी म्हणजेच जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात होणार आहे.हे प्रकरण गंभीर आहे आणि मोठे आहे त्यामुळे विस्तृत सुनावणी जानेवारी महिन्यात केली जाईल असे या घटनापीठने म्हटले आहे. पाच न्यायमुर्तींच्या घटनापीठापुढे आज सुनावणी पार पडली. आता पुढील सुनावणी जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात होणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचं पुढे काय होणार असा प्रश्न मराठा समाजाला पडला आहे. अशात आता अंतरिम स्थगिती उठवण्यास घटनापीठाने नकार दिल्याने हे प्रकरण आणखीणच चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता पुढील सुनावणी जानेवारी महिन्यात केली जाईल असे या घटनापीठने म्हटले आहे.

Share: