IMG-LOGO
COVID-19

कोरोना प्रतिबंधक लसीसाठी टाटा करणार शीतगृह साखळी

Monday, May 10
IMG

जितक्या वेगाने कोरोना लसीकरण करता येईल, तितक्या वेगात ते करावे.

मुंबई, दि. १० मे :  टाटा ग्रुपने परदेशातून 60 क्रायोजेनिक टँकर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबत केंद्र सरकारला दीड हजार कोटी रुपये दिले आहेत. चारशे ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती टाटा ग्रुपच्या अधिकार्‍याने दिली. याद्वारे निर्माण होणारा ऑक्सिजन छोट्या रुग्णालयांमध्ये वापरला जाऊ शकतो. याशिवाय टाटा ग्रुपने ’कोल्ड स्टोरेजची चैन’ तायर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसींना विशिष्ट तापमानात ठेवता येईल.टाटा सन्सचे अध्यक्ष बनमाली अग्रवाल म्हणाले, की जितक्या वेगाने कोरोना लसीकरण करता येईल, तितक्या वेगात ते करावे. जितके वेगवान लसीकरण होईल तेवढ्या लोकांना सुरक्षित करता येईल. हा सुरक्षित मार्ग आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी भारत सरकारने जगभरातील कोरोना प्रतिबंधक लसींना परवानगी दिली पाहिजे. कोरोना लसींसाठी ’कोल्ड चेन’ची गरज असते. या दृष्टीने आम्ही तयारी करत आहोत. सुदैवाने आमच्या ग्रुपकडे वोल्टाससारखी कंपनी आहे. अग्रवाल यांनी आपल्याला आरोग्यासंबधी पायाभूत सुविंधासाठी दीर्घकालीन विचार करून गुंतवणूक करण्याची गरज आहे, असे स्पष्ट केले. ही आपल्या देशासाठी महत्वाची बाब आहे. आपल्या कोरोना विषाणू संसर्गावर मात करण्याच्या क्षमतेवर भारताच्या आर्थिक विकासाची प्रगती अवलंबून असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपल्यासमोर अन्य आव्हान आहेत; पण कोरोनाला प्रतिबंद करू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.

Share: