गेल्या आठवड्यात याच मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दुखापत झाली. प्रधान यांच्या रॅलीवर झालेल्या हल्ल्यात एक भाजप कार्यकर्ता गंभीररित्या जखमी झाला आहे.
कोलकाता, दि. १८ मार्च : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021 निवडणुकीला सातत्यानं हिंसाचाराचा रंग दिलेला दिसून येत आहे. ठिकठिकाणी 13 बाँबस्फोट झाल्यानंतर नंदीग्राम मतदारसंघात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या रॅलीवर हल्ला झाला. हिसंक घटनांत एक ठार तर भाजपचे काही कार्यकर्ते जखमी झाले. गेल्या आठवड्यात याच मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दुखापत झाली. प्रधान यांच्या रॅलीवर झालेल्या हल्ल्यात एक भाजप कार्यकर्ता गंभीररित्या जखमी झाला आहे. हल्ल्यात नंदीग्राम एक दक्षिण मंडळाचे युवा मोर्चा अध्यक्ष पूरन चंद्र पात्रो यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. हा हल्ला तृणमूल काँग्रेसकडून घडवून आणण्यात आल्याचा दावा भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आला आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी जखमी कार्यकर्त्याला हॉस्पिटलमध्ये पोहचवले. सोबतच या प्रकरणाची निवडणूक आयोगाला माहिती देत हिंसाचार रोखण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली.