राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना कोरोनाची लागण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंत्री अनिल परब यांना उपचारांसाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबई, दि. १२ ऑक्टोबर : परब यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर राज्यातील कोरोना बाधित मंत्र्यांची संख्या ८ झाली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील आत्तापर्यंत जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, हसन मुश्रीफ, बच्चू कडू, नितीन राऊत, एकनाथ शिंदे, उदय सामंत यां मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना कोरोनाची लागण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंत्री अनिल परब यांना उपचारांसाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.