प्रीती सुदान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ एप्रिल २०२५ पर्यंत असणार आहे.
दिल्ली, दि. १ : केंद्रीय लोकसेवा आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, मनोज सोनी यांना अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून त्याजागी १९८३ बॅचच्या आयएएस अधिकारी आणि माजी केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मे २०२२ पासून या पदावर मनोज सोनी होते. त्यांची पाच वर्षे उरलेली असतानाच त्यांनी राजीनामा दिला. UPSC उमेदवारांनी निवडीसाठी बनावट जात आणि अपंगत्व प्रमाणपत्रे वापरल्याबद्दल वाद सुरू झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला.यामुळे आता त्यांच्या जागी प्रीती सुदान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ एप्रिल २०२५ पर्यंत असणार आहे.