IMG-LOGO
राष्ट्रीय

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुन्हा एम्स रुग्णालयात दाखल

Tuesday, Aug 18
IMG

२ ऑगस्टला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. स्वत: गृहमंत्र्यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली होती.

नवी दिल्ली, दि. १८ ऑगस्ट  : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना काल रात्री दिल्लीच्या AIIMSमध्ये दाखल करण्यात आले आहे. श्वसनाचा त्रास होत असल्याने अमित शाह यांना पुन्हा रुग्णालयात दाखल केल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच त्यांना ३-४ दिवसांपासून थकवा आणि अंगदुखी जाणवत होती असे AIIMS रुग्णालयाने पत्रात लिहिले आहे.  दरम्यान, २ ऑगस्टला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. स्वत: गृहमंत्र्यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. त्यानंतर १४ ऑगस्ट रोजी त्यांनी आपली करोना चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती दिली होती. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार होम आयसोलेशनमध्ये असल्याचेही सांगितले होते.

Share: