IMG-LOGO
राष्ट्रीय

काँग्रेस नेते नितीन राऊत यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी घेतलं ताब्यात!

Thursday, Aug 20
IMG

पोलिसांनी रोखल्यामुळे चक्क मंत्री नितीन राऊत यांनी रस्त्यावरच कार्यकर्त्यांसह ठिय्या मांडला.

आझमगड, दि. २० ऑगस्ट : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आझमगड येथील सरपंचाच्या मृत्यूप्रकरणी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी मंत्री नितीन राऊत हे उत्तर प्रदेशच्या आझमगड येथे गेले आहेत. मात्र, उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना सीमेवरच थांबवले.पोलिसांनी रोखल्यामुळे चक्क मंत्री नितीन राऊत यांनी रस्त्यावरच कार्यकर्त्यांसह ठिय्या मांडला. यामुळे तणाव निर्माण झाल्याच्या कारणाने आता उत्तर प्रदेश पोलिसांनी नितीन राऊत यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. यामुळे आता युपी पोलीस विरुद्ध महाराष्ट्र सरकार असे वाद पेटण्याचे शक्यता आहे.

Share: