IMG-LOGO
राष्ट्रीय

West Bengal Election Results : नंंदीग्राममधून ममता दीदींचा पराभव, सुवेंद्र अधिकारी यांचा विजय

Sunday, May 02
IMG

संपूर्ण देशाचे लागून राहिलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्तेत येणार, असे संकेत मिळत आहेत.

कोलकाता, दि. २ मे : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत  तृणमूल काँग्रेसने आघाडी घेतली आहे. बंगाल निवडणुकीमध्ये सर्वांची नजर असलेल्या नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांचा परावभ झाला आहे. नंदीग्राम मतदारसंघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव झाल्याची अधिकृत घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आलीसंपूर्ण देशाचे लागून राहिलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्तेत येणार, असे स्पष्ट झाले आहे. ममता बॅनर्जी यांचा पाडाव करण्यासाठी या निवडणुकीत भाजपचे आपली संपूर्ण प्रचारयंत्रणा आणि दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवले होते. गेल्या काही वर्षांमध्ये भाजपकडून बंगालमध्ये पद्धतशीरपणे ध्रुवीकरणाचे राजकारण करण्यात आले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने तृणमूल काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांना गळाला लावले. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्त्वाची लढाई झाली होती. हे आव्हान स्विकारत ममता बॅनर्जी भाजपसमोर ठामपणे उभ्या राहिल्या होत्या.नंदीग्रामचा निर्णय स्वीकारते. पण मी या निर्णयाविरोधात आपण न्यायालयात दाद मागणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर काही फेरफार करण्यात आल्याची माहिती आमच्याकडे आहे, असंही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यावेळी म्हटलं. दरम्यान,  भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी तब्बल १७३६ मतांनी पराभव केला.

Share: