IMG-LOGO
राष्ट्रीय

West Bengal Train Accident : मालगाडीची कंचनजंगा एक्सप्रेसला धडक; ८ प्रवाशांचा मृत्यू

Monday, Jun 17
IMG

नातेवाईकांना मिळावी यासाठी तातडीने एक स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन केलं असून हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.

दार्जिलिंग, दि. १७ : पश्चिम बंगालमध्ये मोठा रेल्वे अपघात झाला आहे. दार्जिलिंग जिल्ह्यामधील न्यू जलपायगुडी येथे रंगापानी स्थानकाजवळ कंचनजंगा एक्स्प्रेस ट्रेनला मालगाडीनं जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार 8 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या अपघातात 17 प्रवासी जखमी झाले आहेत. तातडीनं बचाव पथकं आणि मदतकार्य करणारी यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या दुर्घटनेसंदर्भात आपल्या एक्स अकाऊंटवरुन माहिती दिली आहे.रंगापानी स्थानकाजवळ हा अपघात झाला असून रेल्वेमंत्री अश्विवी वैष्णव यांनीही या अपघातासंदर्भात शोक व्यक्त केला आहे. रेल्वेचे अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असल्याची माहिती रेल्वे मंत्र्यांनी दिली आहे. रेल्वेच्या बचाव पथकांबरोबरच एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या मदतकार्यसाठी घटनास्थळी पोहोचल्या आहेत. मालगाडी अगरतलावरून सियालदाह येथे जात होती. यावेळी या मालगाडीने न्यू जलपाईगुडी येथे रुळावर उभ्या असलेल्या कंचनजंगा एक्सप्रेसला जोरदार धडक दिली. ही धडकी इतकी जोरदार होती, की यावेळी कंचनजंगा एक्सप्रेसलाचे काही डबे थेट रुळावरून हवेत उडाले. रेल्वेने या अपघाताची माहिती प्रवाशांच्या नातेवाईकांना मिळावी यासाठी तातडीने एक स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन केलं असून हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.

Share: