IMG-LOGO
नाशिक ग्रामीण

मुकणे-पाडळीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला ठार

Thursday, Aug 20
IMG

वाडीवरे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

नाशिक, दि.२० ऑगस्ट : इगतपुरी तालुक्यातील मुकणे-पाडळी शिवारातील मुंबई नाशिक रस्त्यावरील विठ्ठल कामत हॉटेलसमोर एक अनोळखी महिलेस  सकाळी ७ च्या सुमारास अज्ञात वाहनाने मुंबई नाशिक रोडने जात असतांना रस्त्याच्या मागून धडक दिली. यात महिला जागीच ठार झाली असून वाहनचालक फरार झाला आहे.महिलेच्या डोक्यास व हातपायास जबर मार लागला होता. वाडीवरे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार भाऊसाहेब भगत करीत आहे.

Share: