महाराष्ट्रात वसुलीची महाआघाडी आहे. हे प्रकरण केवळ एका मंत्र्यांचे नाही, तर उद्धव ठाकरे सरकारवर प्रश्न उपस्थित होत आहे.
रवीशंकर प्रसाद यांची टीका; वसुलीची महाआघाडीनवी दिल्ली, दि. २१ मार्च : भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. ठाकरे सरकारला आता नैतिक अधिकार उरला नसल्याचा घणाघात त्यांनी केला.महाराष्ट्रात वसुलीची महाआघाडी आहे. हे प्रकरण केवळ एका मंत्र्यांचे नाही, तर उद्धव ठाकरे सरकारवर प्रश्न उपस्थित होत आहे. या सरकारने नैतिक अधिकार गमावला आहे, अशी टीका प्रसाद यांनी केली. प्रसाद यांनी पवार यांच्यावरही टीका केली. ठाकरे यांची शांती काय सांगते? पवार यांच्या शांत राहण्यामुळेही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. विधानसभा आणि बाहेरही मुख्यमंत्र्यांनी सचिन वाझे यांना पाठीशी घालण्याच्या प्रयत्नावर गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचेही प्रसाद यांनी म्हटले आहे. वाझे प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. यात मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस आयुक्तांची भूमिकाही असू शकते, अशी शंका प्रसाद यांनी उपस्थित केली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख वाझे यांना महिन्याला शंभर कोटी रुपये गोळा करायला सांगतात. वाझे यांच्याकडून अजून कोणती घाणेरडी कामे केली गेली, असा सवाल प्रसाद यांनी विचारला. पवार यांच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत, असे ते म्हणाले. वाझे अनेक वर्षे निलंबित होते. कोरोना काळात त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले. आता शिवसेना सचिन वाझेला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही प्रसाद यांनी केला.