एका कॅप्टनसह चार जण जखमी झाल्याची माहिती लष्करी सूत्रांनी दिली.
कुपवाडा, दि. २७ : जम्मू आणि काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील कामकारी सेक्टर येथे शनिवारी पाकिस्तानी सैन्याच्या ‘बॉर्डर अॅक्शन टीम’ (बीएटी) या तुकडीने केलेला हल्ला भारतीय लष्कराने उधळून लावला. यामध्ये लष्कराचा एक जवान शहीद झाला असून, एका कॅप्टनसह चार जण जखमी झाल्याची माहिती लष्करी सूत्रांनी दिली.