IMG-LOGO
राष्ट्रीय

अहमदाबादहून मुंबईला जाणाऱ्या डबल डेकर एक्स्प्रेसचे डबे वेगळे झाल्याची घटना

Friday, Aug 16
IMG

अहमदाबादवरून मुंबईला जाणाऱ्या डबल डेकर एक्स्प्रेसचे काही डबे सुरत जवळ अचानक वेगळे झाले.

सुरत, दि. १६ :  गेल्या काही महिन्यांमध्ये रेल्वे अपघाताच्या घटना वाढल्या असल्याचं दिसून येत आहे. आज अहमदाबादहून मुंबईला जाणाऱ्या डबल डेकर एक्स्प्रेसचे काही डबे अचानक वेगळे झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली होती. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा कोणीही जखमी झालेलं नाही. मात्र, ही घटना घडल्यानंतर जवळपास तीन ते चार तास गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.अहमदाबादवरून मुंबईला जाणाऱ्या डबल डेकर एक्स्प्रेसचे काही डबे सुरत जवळ अचानक वेगळे झाले.

Share: