रतन टाटा यांच्या जीवनाचा आणि कार्याचा भारतीय अर्थव्यवस्थेशी खूप संबंध आहे.
मुंबई, दि. १० : देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले आहे. मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. रतन टाटा यांच्यावर उपचार सुरु असताना इंटेसिव्ह केअर युनिटमध्ये ठेवण्यात आलं होतं. रतन टाटा यांच्या निधनामुळे संपूर्ण देशासह उद्योगविश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. उद्योजक आनंद महिंद्रा यांनी शोक व्यक्त केला आहे. रतन टाटा यांची अनुपस्थिती मला स्वीकरता येत नाहीय. भारताची अर्थव्यवस्था ऐतिहासिक झेप घेण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे आणि रतन टाटा यांच्या जीवनाचा आणि कार्याचा भारतीय अर्थव्यवस्थेशी खूप संबंध आहे. त्यामुळे या वेळी त्यांचे मार्गदर्शन बहुमोल ठरले असते. ते गेल्यावर, आपण फक्त त्यांच्या विचारांचं अनुकरण करू शकतो. कारण ते असे व्यापारी होते ज्यांच्यासाठी आर्थिक संपत्ती आणि यश हे जागतिक समुदायाच्या सेवेसाठी सर्वात जास्त उपयुक्त होते. तुम्हाला विसरलं जाणार नाही. कारण महापुरुष कधीच मरत नाहीत.” असे त्यांनी म्हटले आहे.