IMG-LOGO
राष्ट्रीय

राजधानी दिल्लीचा कारभार आतिशी यांच्या हाती

Tuesday, Sep 17
IMG

आतिशी या कालकाजी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत.

दिल्ली, दि. १७ :  दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून आतिशी मार्लेना यांची आम आदमी पार्टीने एकमुखाने निवड केली आहे. या पदासाठी आता आतिशी यांचं नाव निश्चित झालं आहे. आतिशी यांच्या नावाची घोषणा होताच आप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. दुसऱ्या बाजूला अरविंद केजरीवाल हे आज (१७ सप्टेंबर) उपराज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करतील. पुढील दोन ते तीन दिवसांत आतिशी या दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. आतिशी या आम आदमी पार्टीमधील वरच्या फळीतील नेत्यांपैकी एक आहेत. तसेच त्या अरविंद केजरीवाल यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. माजी उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्री मनिष सिसोदिया तुरुंगात गेल्यानंतर केजरीवाल यांनी शिक्षण मंत्रालयासह सिसोदिया यांच्याकडील खाती व इतर महत्त्वाची खाती आतिशी यांच्याकडे सोपवली होती. आतिशी या कालकाजी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत.

Share: