IMG-LOGO
राष्ट्रीय

भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांचा राडा, मुकुल रॉयना धक्काबुक्की

Tuesday, Mar 16
IMG

तृणमूल काँग्रेस सोडून अलिकडेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सोवन चट्टोपाधाध्याय आणि बैसाखी बंडोपाध्याय यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी भाजपचा राजीनामा दिला.

कोलकाता, दि. १६ मार्च :  भाजपने पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर उमेदवारी न मिळाल्याने नाराज नेते आणि त्यांच्या समर्थकांनी भाजपच्या कार्यलयात जोरदार राडा केला. उमेदवारी न मिळाल्याने अनेकांनी भाजपवर नाराजी व्यक्त करत पक्षाचा राजीनामा दिला. नाराजांनी तेथील बॅरिकेडींग तोडण्याचा प्रयत्नही केला. बराच वेळ हा राडा सुरू होता. एवढेच नव्हे तर पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय, शिव प्रकाश आणि अर्जुन सिंह यांना धक्काबुक्कीही केली गेली. नाराज भाजप कार्यकर्ते हे हावडामधील पंचला येथील होते, असे सूत्रांनी सांगितले.तृणमूल काँग्रेस सोडून अलिकडेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सोवन चट्टोपाधाध्याय आणि बैसाखी बंडोपाध्याय यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी भाजपचा राजीनामा दिला. चट्टोपाध्याय हे अनेक दशकांपासून बेहाला पूर्व मतदारसंघातून निवडून आले आहेत; पण येथून भाजपने पायल सरकारला उमेदवारी दिली आहे. पायर या अलिकडेच भाजपमध्ये दाखल झाल्या आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांना चट्टोपाध्याय यांनी पत्र लिहिले आहे. आपला अपमान केल्याचा आरोप त्यांनी पत्रातून केला आहे. भाजपने पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तिसर्‍या आणि चौथ्या टप्प्यातील एकूण 75 मतदारसंघांपैकी 63 जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. राज्यात आठ टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांच्या नावांची घोषणा होताच नाराजांचा विरोध सुरू झाला आहे. अलिकडेच पक्षात प्रवेश केलेल्या नेत्यांना अधिक महत्त्व दिल्याचा आरोप पक्षात आधीपासूनच सक्रिय असलेल्या नेत्यांनी केला आहे, तर काही नव्या नेत्यांनी आपल्या दिलेल्या मतदारसंघावरून नाराजी व्यक्त केली आहे.

Share: