IMG-LOGO
राष्ट्रीय

बिहारमधील ६५ टक्के आरक्षण स्थगितीच्या हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाचा नकार

Monday, Jul 29
IMG

सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबरमध्ये अंतिम सुनावणी होईल, असं सांगितलं आहे.

नवी दिल्ली, दि. २९  : आरक्षण प्रकरणात पाटणा उच्च न्यायालयानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने बिहार सरकारला (Bihar Government) मोठा झटका दिला आहे. बिहार सरकारच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय (Supreme court) सुनावणीसाठी तयार झाला असला तरी यासाठी सप्टेंबरची तारीख देण्यात आली आहे.  सर्वोच्च न्यायालयाने पाटणा उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. वंचित, आदिवासी आणि मागासवर्गीयांसाठी आरक्षण प्रकरणात बिहार सरकारला सध्या कोणताही दिलासा नाही. वंचित, आदिवासी आणि मागासवर्गीयांसाठीचे आरक्षण 50 टक्क्यांवरून 65 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा कायदा उच्च न्यायालयाने रद्द केला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालय बिहार सरकारच्या याचिकेवर सुनावणी करण्यास तयार आहे. सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबरमध्ये अंतिम सुनावणी होईल, असं सांगितलं आहे.

Share: