IMG-LOGO
राष्ट्रीय

बिहार निवडणूक : आरजेडी १४४ तर काँग्रेस ७० जागांवर लढणार

Saturday, Oct 03
IMG

जागा वाटप जाहीर होताच मुकेश साहनी यांच्या व्हीआयपी पक्षाने नाराजी व्यक्त केली. जागा वाटपात अन्याय झाल्याची भावना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवली.

पाटणा, दि. ०३ ऑक्टोबर :  आगामी बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून शनिवारी महाआघाडीचे जागावाटपावर एकमत झाले आहे. २४३ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत आरजेडी १४४ तर काँग्रेस ४४ जागांवर लढणार आहे. जागा वाटप जाहीर होताच मुकेश साहनी यांच्या व्हीआयपी पक्षाने नाराजी व्यक्त केली. जागा वाटपात अन्याय झाल्याची भावना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवली. अनेकांनी तेजस्वी यादव  मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या. पक्षाला किमान २५ जागा मिळायला हव्या अशी मागणी करत महागठबंधनच्या पत्रकार परिषदेवर व्हीआयपी पक्षाने बहिष्कार टाकला.२०१५ च्या विधानसभा निवडणुकीत आरजेडी १०१, जेडीयू १०१ आणि काँग्रेस ४१ जागांवर लढली होती. जेडीयू तेव्हा महाआघाडीमध्ये होती. पण नंतर जेडीयूने भाजपसोबत हातमिळवणी केली.  बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या नेतृत्वात एनडीए बिहार निवडणूक लढवणार आहे.

Share: