शेणापासून वेगवेगळे रंग बनवण्यासाठी एक प्रकल्प उभारण्यासाठी 15 लाख रुपयांचा खर्च येतो. गडकरी यांचे स्वप्न पूर्ण झाल्यास गावातून शहराकडे रोजगारासाठी वाढणारा लोंढा कमी होऊ शकतो.
नितीन गडकरी यांची घोषणा; गाईच्या शेणाला प्रतिकिलो पाच रुपये भावनवी दिल्ली, दि. १४ फेब्रुवारी : केंद्रीय मध्यम व लघू उद्योग मंत्रालय शेणापासून रंग करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा प्रत्येक गावामध्ये शेणापासून रंग बनवण्याचा उद्योग सुरू करण्याचा मानस आहे. असे उद्योग सुरू झाल्यास शेणाला पाच रुपये किलो भाव मिळेल, असा अंदाज गडकरी यांनी व्यक्त केला. शेणापासून वेगवेगळे रंग बनवण्यासाठी एक प्रकल्प उभारण्यासाठी 15 लाख रुपयांचा खर्च येतो. गडकरी यांचे स्वप्न पूर्ण झाल्यास गावातून शहराकडे रोजगारासाठी वाढणारा लोंढा कमी होऊ शकतो. गडकरी यांनी 12 जानेवारी 2021 रोजी खादी ग्रामोद्योग आयोगाने शेणापासून बनवलेल्या रंगाचे लाँचिंग केले. त्या वेळी गडकरी यांनी हा रंग इकोफ्रेंडली, विषरहित असल्याचे म्हटले होते. भारतीय प्रमाणीकरण संस्थेकडून शेणापासून बनवलेल्या रंगाला प्रमाणित करण्यात आले आहे. मध्यम आणि लघू मंत्रालयाच्या अधिकार्याने सांगितलेल्या माहितीनुसार गडकरी यांनी शेणापासून रंग बनवण्यासाठी प्रेरणा दिली होती. जयपूर येथील कुमरप्पा नॅशनल हँडमेड पेपर इनस्टिट्यूटने यातील पेटंट मिळवले आहे. शेणामध्ये शिसे, पारा, क्रोमियम, आर्सेनिक आणि कॅडमियम याचा वापर केला आहे. गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार पर्यावरणस्नेही रंगांची बाजारात मागणी वाढली आहे. सध्या जयपूरमध्ये प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणासाठी अनेक जण प्रतीक्षेत आहेत. 350 जण प्रतीक्षा यादीत असल्याचीदेखील माहिती आहे. हे प्रशिक्षण सात दिवसांचे असते. आगामी काळात प्रशिक्षणामधील सुविधा वाढवण्याचा विचार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. त्यामुळे गावागावातील लोक शेणापासून रंग बनवण्याची कंपनी स्थापन करू शकतात. शेणापासून रंग तयार करायचे, ही नवी योजना आहे. शेणापासून ऑईलपेंट आणि डिस्टम्बर तयार केले जाणार आहे. विशेष म्हणजे मार्केटमध्ये जितके रंग आहेत, त्यापेक्षा हे रंग चांगले आहे. मी स्वत: माझ्या घरी हे रंग लावले आहेत. मी तुम्हा सगळ्यांना सांगतो, तुम्हीदेखील हे रंग वापरा. आता तर या रंगासाठी प्रतीक्षा यादी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे 550 रुपयांचे रंग अवघ्या 225 रुपयांत मिळेल, अशी माहिती त्यांनी दिली. प्रत्येक गावात एक 15 लाखांचा प्रकल्प उभा राहावा, असे गडकरी यांचे स्वप्न आहे. रंगासाठी जे शेण असेल त्याला पाच रुपये किलो भाव मिळणार आहे. माझ्या घरी 25 जनावरे आहेत. गाय, बैल, म्हैस आहेत. मला त्यातून कमीतकमी 300 किलो शेण मिळेल. त्यातून मला 1500 रुपये दररोज मिळतील. 30 दिवसांत तब्बल 45 हजार रुपये फक्त शेणातून मिळतील. ज्यांच्याकडे दोन-तीन गाय, म्हैस आहेत त्यांना आठ-दहा हजार रुपये फक्त शेणापासून मिळतील, असे त्यांनी सांगितले.