IMG-LOGO
राष्ट्रीय

राजकारण सोडणार नाही, नवा पक्ष काढणार : चंपाई सोरेन

Thursday, Aug 22
IMG

मी नवीन पक्ष स्थापन करू शकतो, असे सोरेन यांनी सांगितले.

रांची, दि. २२ : मी राजकारण सोडणार नाही. नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचा पर्याय नेहमीच खुला आहे, असे झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी स्पष्ट केले.सोरेन म्हणाले की, ‘झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेत्यांकडून अपमान सहन केल्यानंतर’ मी माझ्या योजनांवर ठाम आहे. आपण झारखंड मुक्ती मोर्चासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केल्याचा दावा सोरेन यांनी केला. ‘हा माझ्या आयुष्यातील एक नवीन अध्याय आहे,’ असेही सोरेन यांनी मंगळवारी सरायकेला-खरसावन जिल्ह्यातील झिलिंगोरा या मूळ गावी पोहोचल्यानंतर सांगितले.मी राजकारण सोडणार नाही, कारण मला माझ्या समर्थकांचे खूप प्रेम आणि पाठिंबा मिळाला आहे. मी नवीन पक्ष स्थापन करू शकतो, असे सोरेन यांनी सांगितले.

Share: