प्राणीसंग्रहालयातल्या अधिकार्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. या सिंहांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली.
हैदराबाद, दि.४ मे : देशात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. फक्त माणसेच नाही, तर आता प्राणीही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. हैदराबादमधल्या नेहरु प्राणीसंग्रहालयातल्या आठ सिंहांना कोरोनाची लागण झाली आहे.या प्राणीसंग्रहालयातल्या अधिकार्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. या सिंहांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. ती पॉझिटिव्ह आली आहे. या सिंहांना विलगीकरणात ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.