मागील सत्रात चांदी 83,596 रुपयांवर स्थिरावली होती.
मुंबई, दि. २ : मागच्या आठवड्यात निच्चांकी घसरणीनंतर मौल्यवान धातूचे भाव पुन्हा एकदा वधारले आहेत. आज महिन्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीचे भाव वाढले आहेत. आज भारतीय वायदे बाजारात सोनं एका झटक्यात 600 रुपयांच्या जवळपास महागले आहे. तर, चांदीदेखील 500 रुपयांपेक्षा अधिक महाग झाले आहे. त्यामुळं पुन्हा एकदा खरेदीदारांचा हिरमोड झाला आहे. अर्थसंकल्पात सोन्यावरील कस्टम ड्युटी कमी करण्यात आल्याची घोषणा केली होती. त्यानंतर मागील आठवड्यात सोन्याचे भाव चांगलेच कोसळले होते. एकाच आठवड्यात सोनं 5 हजारांनी स्वस्त झालं होतं. मात्र, या आठवड्यात सोमवारपासूनच सोनं महागलं आहे. आजही मौल्यवान धातूच्या किंमतीत वाढ झाली आहे. आज 24 कॅरेट प्रतितोळा सोन्याचे दर 70 हजार 360 वर स्थिरावले आहे. तर, चांदी यावेळी 564 रुपयांनी वाढून 84,160 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिरावली आहे. मागील सत्रात चांदी 83,596 रुपयांवर स्थिरावली होती.