सर्वधर्म समुदायचा संदेश देत येवला तालुक्यातील अंंदरसुल ग्राम पंंचायत येथे सालाबाद प्रमाणे लक्ष्मीपूजन मोठ्या उत्साहात करण्यात आले.
अंदरसुल ग्रामपंचायत कार्यालयात सर्वधर्मीय लक्ष्मीपूजन येवला : सर्वधर्म समुदायचा संदेश देत येवला तालुक्यातील अंंदरसुल ग्राम पंंचायत येथे सालाबाद प्रमाणे लक्ष्मीपूजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. सरपंच सौ. विनिता सोनवणे यांच्या संकल्पनेतुन ग्रामपालिका ही सर्व गावाची असते म्हणून या आनंददायी उत्साहात सर्व धर्मीय नागरिकांचा सहभाग असावा अशी भावना व्यक्त केली. दरम्यान लक्ष्मीपूजनाच्या वेळी गावातील सर्व धर्मियांना निमंत्रित करण्यात आले होते.यावेळी सरपंच विनिता सोनवणे , मोहसिन इनामदार, फकीर पठाण यांच्या हस्ते ग्राम पालिकेच्या दप्तराचे पूजन ग्रामपंचायत सभागृहात करण्यात आले.त्यानंतर सामूहिक रित्या फटाक्यांची आतषबाजी करून आंदोउत्सव साजरा करण्यात आला.प्रसंगी इनामदार यांनी या उपक्रमाचा गौरव केला.या पुढे ही गावात सामाजिक एकोपा टिकून राहण्यासाठी ग्रामपालिकेने या सारखे उपक्रम राबवावे असे आव्हान केले.व या उपक्रमाला शुभेछ्या दिल्या.याप्रसंगी मकरंद सोनवणे,सरपंच विनिता सोनवणे,मोहसीन इनामदार,फकीर पठाण, विलास गाढे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.