IMG-LOGO
नाशिक ग्रामीण

नांदगाव तालुक्यातील वखारी येथे चार जणांचा खून

Friday, Aug 07
IMG

एकाच कुटुंबातील चार जणांचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना नांदगाव तालुक्यातील वखारी येथे घडली आहे.

नांदगाव दि ७ ऑगस्ट :  एकाच कुटुंबातील चार जणांचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना नांदगाव तालुक्यातील वखारी येथे घडली आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ माजली आहे.मृतांमध्ये समाधान चव्हाण,भरताबाई चव्हाण या पती-पत्नीसह त्यांचा ६ वर्षाचा मुलगा गणेश चव्हाण आणि ४ वर्षाची आरोही चव्हाण यांचा समावेश आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा तपास सुरू आहे.

Share: