IMG-LOGO
नाशिक ग्रामीण

नेत्यांना हवेत ठेऊन मतदारांनी भुजबळांना दिले बळ

Thursday, Oct 24
IMG

संबंध महाराष्ट्राचे लक्ष असलेल्या भुजबळांना येवल्यातून दणदणीत विजय मिळाला असून सेनेच्या संभाजी पवार यांचा पराभव झाला आहे.

नेत्यांना हवेत ठेऊन मतदारांनी भुजबळांना दिले बळ भुजबळांचा गड आला पण सिंह गेला नाशिक दि.२४ l संबंध महाराष्ट्राचे लक्ष असलेल्या भुजबळांना येवल्यातून दणदणीत विजय मिळाला असून सेनेच्या संभाजी पवार यांचा पराभव झाला आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या निवडणूकित महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात शिवसेनेचे संभाजी पवार यांनी लढत दिली होती दरम्यान त्यांना पराभव पत्करावा लागला. गेल्या पंचवार्षिक निवडणूकित देखील छगन भुजबळांनी संभाजी पवार यांना ४६४४२ मतांनी पराभवाचा मार्ग दाखविला होता याही वेळी छगन भुजबळ ५६८८१ मतांच्या आघाडीने विजयी झाले असून येवला येथील भुजबळ संपर्क कार्यालय येथे भुजबळ समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. येवल्यातील जवळपास सर्वच नेत्यांनी भुजबळांविरोधात दंड थोपटले होते मात्र बाहुबली असलेल्या भुजबळांना त्याचा कोणताही परिणाम जाणवला नाही. मतदानाच्या अंतिम टप्प्यात जातीचे पातीचे राजकारण तसेच भूमीपुत्र असल्याचा दावा मतदारांनी मोडीत काढत विकासाच्या मुद्यावर भुजबळांच्या बाहुत बळ आले असले तरी नांदगाव विधानसभेत भुजबळांचे पुत्र पंकज भुजबळ यांचा शिवसेनेच्या सुहास कांदेंनी चांगलीच धोबीपछाड दिली. छगन भुजबळ यांना १२५७१० मते पडली तर शिवसेनेचे संभाजी पवार यांना ६८८२९ मते पडली 

Share: