IMG-LOGO
प्रशासकीय

पोलीस प्रबोधिनीमध्येपर्यावरण पुरक प्रकल्पाचे उदघाटन संपन्न

Friday, Oct 04
IMG

महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी नाशिक येथे प्रशिक्षणासाठी येणारे अधिकारी व प्रबोधिनीत वास्तव्यास असणारे अधिकारी व कर्मचारी यांच्या मुलभूत गरजासोबत पाण्याचे स्त्रोत कायम रहावे व भविष्यात पाण्याचे संकट उदभवू नये यासाठी 150 एकर परिसरात वसलेल्या पोलीस प्रबोधिनीमध्ये पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्या मार्गदर्शनातून पोलीस प्रबोधिनी संचालक, श्रीमती अश्वती दोर्जे यांच्या प्रयत्नातून लॉर्ड इंडिया या कंपनीच्या अर्थसहाय्याने रेन वॉटर हार्वेस्टींग प्रोजेक्ट हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे उदघाटन अपर मुख्य गृह सचिव संजयकुमार यांच्या हस्ते करण्यात आले.

नाशिक दि.4 -  महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी नाशिक येथे प्रशिक्षणासाठी येणारे अधिकारी व प्रबोधिनीत वास्तव्यास असणारे अधिकारी व कर्मचारी यांच्या मुलभूत गरजासोबत पाण्याचे स्त्रोत कायम रहावे व भविष्यात पाण्याचे संकट उदभवू नये यासाठी 150 एकर परिसरात वसलेल्या पोलीस प्रबोधिनीमध्ये पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्या मार्गदर्शनातून पोलीस प्रबोधिनी संचालक, श्रीमती अश्वती दोर्जे यांच्या प्रयत्नातून लॉर्ड इंडिया या कंपनीच्या अर्थसहाय्याने रेन वॉटर हार्वेस्टींग प्रोजेक्ट हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे उदघाटन अपर मुख्य गृह सचिव संजयकुमार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल, अपर मुख्य गृह सचिव संजयकुमार, अपर पोलीस महासंचालक संजय सक्सेना, लॉर्ड इंडिया कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर विलास ढवळे, सेंटर फॉर इन्व्हारमेंटल रिसर्च ॲण्ड एज्युकेशनचे संस्थापक डॉ. राशने पारडीवाला, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, विभागीय आयुक्त राजाराम माने, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.छेरिंग दोर्जे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आरती सिंह, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व पोलीस प्रबोधिनीचे अधिकारी कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. श्री.संजय कुमार म्हणाले, पाणी हे बहुमुल्य असुन त्याचे महत्व पोलीस अकादमीच्या अधिकारी वर्गाने ओळखले. भविष्यात वॉटर स्टोरेज, वॉटर रिचार्ज, वॉटर रिसायकलींग करण्याची आवश्यकता आहे. पोलीस प्रबोधिनीमधुन प्रशिक्षण घेणारे अधिकारी हे गावागावात जाणार असुन गाव भेटी दरम्याने पाण्याच्या समस्येबाबत गावकऱ्यांना वॉटर हार्वेस्टिंग प्रोजेक्ट बद्दल माहिती देतील व हा प्रकल्प राबविण्याबाबत जनतेला आवाहन करतील. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस दलाच्या नावलौकीकात भर पडेल. श्री.सुबोधकुमार म्हणाले, ग्रामीण भागात दुष्काळ किंवा पूर परिस्थितीला सामोरे जावे लागते.समाजात पाणी आणि वीज यावरुन जास्तीत जास्त वाद निर्माण होतात. तेंव्हा आपण जनतेला अशा पर्यावरणपुरक प्रकल्पाची माहिती देऊन जनजागृती केली तर पाण्यावरुन होणारे वाद मिटतील. जास्तीत जास्त जनतेमध्ये वॉटर हार्वेस्टिंग प्रोजेक्ट बाबत जनजागृती करावी. महाराष्ट्रातील सर्व पोलीस प्रशिक्षण संस्था, एसआरपीएफ गट, तसेच राज्यातील विस्तृत परिसराचे मुख्यालय व पोलीस लाईन असलेले जिल्हे , आयुक्तालय या ठिकाणी हा उपक्रम सुरु करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. श्री.विलास ढवळे म्हणाले, मानवाची कल्पना शक्ती आणि कल्पना विचार हे अशक्य गोष्टी शक्य करु शकतात याचे समाजासमोर मुर्तीमंत उदाहरण म्हणून रेन वॉटर हार्वेस्टींग प्रकल्प च्या माध्यमातून महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी नाशिक हे आहे.  डॉ.राशने पारडीवाला म्हणाले, आगामी काळात असे पर्यावरण पुरक प्रकल्प सातत्याने सर्वांनीच राबविले पाहिजे अशी आशा व्यक्त करुन आमची संस्था नेहमीच अशा प्रकल्पासाठी मदत करेल असे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती अश्वती दोर्जे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रशिक्षण उपसंचालक सुनील लांजेवार यांनी केले.

Share: