येवल्याच्या बसस्थानकात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून याकडे शासनाचे कुठलेही लक्ष नाही. नगरपालिका ही लक्ष घालत नसल्य़ाने या बसस्थानकामध्ये प्रवाशांना सणासुदीच्या काळात पायी चालणे देखील अवघड झाले आहे.
नाशिक । येवल्याच्या बसस्थानकात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून याकडे शासनाचे कुठलेही लक्ष नाही. नगरपालिका ही लक्ष घालत नसल्य़ाने या बसस्थानकामध्ये प्रवाशांना सणासुदीच्या काळात पायी चालणे देखील अवघड झाले आहे. मोटरसायकल धारकांना कसा रस्ता शोधावा असा प्रश्न पडत आहे. दीपावलीच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची बस स्थानकात वर्दळ वाढली आहे. यामध्येच या बस स्थानकाची अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की खड्ड्यात बस स्थानक की बसस्थानकात खड्डे असे प्रवासी म्हणू लागले आहेत. गेल्या आठवड्यापासून रिमझिम पाऊस चालू असून या पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचलेले आहे. प्रवाशांचे या बसस्थानकामध्ये अतोनात हाल होत असून याकडे कुणाचेही लक्ष नाही. शासन गांभीर्याने घेत नाही. या बसस्थानकातील खड्डे मुरूम टाकून बुजवावे अशी मागणी प्रवासी करत आहे.