IMG-LOGO
नाशिक ग्रामीण

येवल्यात मतदारांची जनजागृती

Friday, Oct 18
IMG

मानवी साखळीतून विद्यार्थ्यांनी मतदारांची केली जनजागृती

येवला दि.१८ येवला तालुक्यातील अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय येथे विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी व मतदारांची जनजागृतीसाठी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांनी वोट-फॉर २०१९ अशी मानवी साखळी तयार करून मतदारांना आपला हक्क बजावण्याचा संदेश दिला. प्राचार्य सचिन सोनवणे व मुख्याध्यापक जयश्री परदेशी यांच्या कल्पकतेतून व सचिन बोढरे व संदिप बोढरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार केली. शालेयस्तरावर विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्व पटवून देऊन शेजारी व घरातील सदस्यांना मतदान हक्काचे महत्व सांगून एक चांगल्याप्रकारे संकल्प तयार केला. 

Share: