संकल्प खरोखरच संपूर्ण देशाचा अर्थसंकल्प आहे काय?" असा प्रश्नही ठाकरे गटाने विचारला आहे.
मुंबई, दि. २४ : "केंद्रीय सरकारच्या तिजोरीत कराच्या रूपाने सर्वाधिक भर घालणाऱ्या महाराष्ट्राला या अर्थसंकल्पातून छदामही मिळाला नाही. निधी तर सोडाच; पण अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्र व मुंबईचा साधा उल्लेखही केला नाही," असं ठाकरे गटाने 'सामना'मधून नाराजी व्यक्त करताना म्हटलं आहे. तसेच राज्यातील शिंदे सरकावरही ठाकरे गटाने बजेटच्या माध्यमातून टोला लगावताना केंद्र सरकारच्या मनात महाराष्ट्राबद्दल आकस असल्याचा आरोप केला आहे. "‘खोके’शाहीच्या माध्यमातून महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार सत्तेवर आणूनही केंद्रीय सरकारच्या मनात महाराष्ट्राविषयी किती आकस व द्वेष भरला आहे, हेच केंद्रीय अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्प 2024-25 मध्ये बिहार आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांना मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी केंद्रामध्ये बिहारमधील नितीशकुमार यांच्या जनता दल युनायडेट आणि आंध्र प्रदेशमधील चंद्रबाबू नायडूंच्या तेलगू देसम पार्टीच्या पाठिंब्यावर सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला आहे. "निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला हा ‘खुर्ची टिकाओ’ संकल्प खरोखरच संपूर्ण देशाचा अर्थसंकल्प आहे काय?" असा प्रश्नही ठाकरे गटाने विचारला आहे.