गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने काळजी घ्यावी, असेदेखील त्यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली/मुंबई, दि. २० एप्रिल : काँग्रेसचे नेते राहुल गांधी, महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राहुल यांनी स्वतः ट्वीट करून ही माहिती दिली आहे. कोविडची लक्षणे आढळल्यानंतर त्यांनी चाचणी केली. ती होकारात्मक आली. कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्यामुळे चाचणी केल्याची माहिती राहुल यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने काळजी घ्यावी, असेदेखील त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. अमित यांना गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची लक्षणे जाणवत होती. त्यांची चाचणी होकारात्मक आली आहे. अमित यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.