IMG-LOGO
COVID-19

महाराष्ट्रात दिवसभरात ६ हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त

Monday, Dec 21
IMG

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट ९४.२४ वर गेला आहे. तर दिवसभरात २ हजार ८३४ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

मुंबई, दि. २१ डिसेंबर : राज्यात गेल्या २४ तासांत नव्या २८३४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून आज ५५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यभरातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ५९४६९ झाली आहे. तसेच आज ६०५३ जणांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली आहे.राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट ९४.२४ वर गेला आहे. तर दिवसभरात २ हजार ८३४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४ तासामध्ये ५५ जणांचा मृत्यू झाला असून राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचा दर २.५७% इतका आहे. तर कोरोना रुग्णांची संख्या ही १८ लाख ९९ हजार ३५२ एवढी झाली आहे.

Share: