महायोगी गगनगिरी महाराजांची इतर वैशिष्ट्ये सध्याच्या कलीयुगामध्येही योगशास्त्रातील अनेकविध अवघड सिद्धी व चमत्कार प्रत्यक्ष आत्मसात केलेले असे ते महायोगी होते.
युगाब्द :५१२२भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक माघ १९ शके १९४२सूर्योदय : ०७:०६ सूर्यास्त : १८:३२चंद्रोदय : ०५:०१, फेब्रुवारी ०९ चंद्रास्त : १५:१७शक सम्वत : १९४२ शार्वरीचंद्र माह : पौषपक्ष : कृष्ण पक्षतिथि : द्वादशी - ०३:१९, फेब्रुवारी ०९ पर्यंतनक्षत्र : मूळ - १५:२१ पर्यंतयोग : हर्षण - ११:३२ पर्यंतकरण : कौलव - १६:०२ पर्यंतद्वितीय करण : तैतिल - ०३:१९, फेब्रुवारी ०९ पर्यंतसूर्य राशि : मकरचंद्र राशि : धनुराहुकाल : ०८:३१ ते ०९:५७गुलिक काल : १४:१५ ते १५:४०यमगण्ड : ११:२३ ते १२:४९अभिजितमुहूर्त : १२:२६ ते १३:१२दुर्मुहूर्त : १३:१२ ते १३:५८दुर्मुहूर्त : १५:२९ ते १६:१५अमृत काल : ०९:११ ते १०:४४वर्ज्य : १३:४९ ते १५:२१वर्ज्य : ००:४०, फेब्रुवारी ०९ ते ०२:१३, फेब्रुवारी ०९महायोगी गगनगिरी महाराजांची इतर वैशिष्ट्ये सध्याच्या कलीयुगामध्येही योगशास्त्रातील अनेकविध अवघड सिद्धी व चमत्कार प्रत्यक्ष आत्मसात केलेले असे ते महायोगी होते. योगशास्त्रातील विमलज्ञान, शिवयोग, उन्मनी विद्या, गोरक्षनाथी विद्या अशा अनेक विद्या त्यांना आत्मसात होत्या.निसर्गाच्या सान्निध्यात अनेक प्रकारची खडतर तपे करून त्यांनी हे अत्यंत अवघड व वैशिष्ट्यपूर्ण ज्ञान आत्मसात केले होते. प.पू. महाराजांनी योगसामर्थ्यांचा संदेश सर्वत्र पोहोचवला. प.पू. महाराजांनी हिमालय व गंगेचे खोरे येथेही तपश्चर्या केली. १९३२ ते १९४० सालापर्यंत महाराजांनी दाजीपूर येथील पाटाचा डंक या भागात राहून अरण्यनिवासी तप केले. १९६५ पासून त्यांची कीर्ती जगभर पसरली. निर्मनुष्य व अनेक हिंस्त्र श्वापदे असणाऱ्या गगनगडावरील ५२ तळी व सांगलीतील वाटार येथील ५ ते ६ डोहांत त्यांनी दीर्घकाळ जलतपश्चर्या केली. त्यासाठी ते पाण्याच्या तळाशी जाऊन योगिक क्रियांच्या साहाय्याने तेथे ध्यान लावून कित्येक तास बसत असत.आज गगनगिरी महाराज पुण्यतिथी आहे (श्रीपाद बाळासाहेब पाटणकर (साळुंखे) हे त्यांचे मूळ नाव.डॉ. जाकिर हुसैन- जर्मन देशामध्ये जाऊन अर्थशास्त्राची पीएच. डी केलेले अलिगढ वैष्णव विद्यालयाचे उपकुलपती होते. त्यांचे अध्यक्षतेखाली ‘विश्वविद्यालय शिक्षा आयोग’ स्थापन करण्यात आला. तसेच भारतीय प्रेस आयोग, विश्वविद्यालय अनुदान आयोग, यूनेस्को, अन्तर्राष्ट्रीय शिक्षा सेवा तथा केन्द्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड ह्यासाठी कार्यरत होते. १३ मे १९६२ ते १२ मे १९६७ पर्यंत भारताचे उपराष्ट्रपती होते तसेच १३ मे १९६७ ते ३ मे १९६९ राष्ट्रपती होते. १९६३ मध्ये त्यांना भारतरत्न ह्या सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला.१८९७: भारताचे ३ रे राष्ट्रपती, शिक्षणतज्ञ पद्मविभूषण व भारतरत्न डॉ. झाकिर हुसेन यांचा जन्म. (मृत्यू: ३ मे १९६९)२०२० : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठतम प्रचारकांपैकी एक आणि भारतीय विचार केंद्राचे संस्थापक- संचालक पद्मश्री पी. परमेश्वरन - पी. परमेश्वरन हे प्राचीन भारतीय ज्ञानातील एक विद्वान अधिकारी होते. ते एक प्रख्यात लेखक, मान्यताप्राप्त कवी, संशोधक आणि द्रष्टे होते व राष्ट्रीय पुनरुत्थानाच्या कार्याला कटिबद्ध होते.ते भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव (१९६७ – १९७१ ) आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष (१९७१-१९७७) होते. आणि दीनदयाळ संशोधन संस्था, नवी दिल्लीचे माजी संचालक (१९७७ - १९८२) होते.केरळमधील अलप्पुळा जिल्ह्यातील मुहम्मा येथे १९२७ मध्ये जन्मलेले परमेश्वरन यांनी विद्यार्थी दशेतच संघात प्रवेश केला. त्यांनी केरळ विद्यापीठातून बी.ए. इतिहास (ओनर्स) डिंस्टिक्शनसह पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय पुनर्रचनेच्या कार्यासाठी स्वत:ला वाहून घेतले आणि पूर्णवेळ संघ प्रचारक म्हणून बाहेर पडले.श्रीमती इंदिरा गांधी यांनी जाहीर केलेल्या पाशवी आणीबाणीच्या काळात त्यांनी निरंकुश राजवटीच्या विरोधात अखिल भारतीय सत्याग्रहाचा भाग म्हणून स्वतःला अटक करवून घेतली. त्यांना मिसाअंतर्गत १६ महिने तुरूंगात टाकण्यात आले.अथक उच्चभ्रू आणि बौद्धिक सेनानी असल्याने डाव्या विचारवंतांनी केलेले देशविरोधी, नकारात्मक आणि विभाजनवादी हल्ले ओळखण्याची अंतःप्रेरणा व अंतर्दृष्टी परमेश्वरनजी यांच्याकडे होती आणि त्यांच्याशी नेहमीच त्यांनी लढा दिला. आपल्या महान राष्ट्राच्या पुनर्रचनेसाठी डाव्या विचारांचा प्रतिकार करून स्वदेशी भावनेने राष्ट्रीय चेतना भरण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर जनजागृतीचे वातावरण तयार करण्यात त्यांना यश आले.राष्ट्रीय पुनरुत्थानाचे एक केंद्र असलेल्या भारतीय विचार केंद्राची स्थापना परमेश्वरनजींनी १९८२ मध्ये केरळवासीयांमध्ये राष्ट्रवादी विचारांना चालना देण्यासाठी केली. त्यानंतर संशोधन प्रकल्पांचे संशोधन, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे, पुस्तके आणि नियतकालिके इत्यादी काम करण्यात आली. ई. एम. एस. नंबुद्रीपाद यांच्यासारख्या प्रख्यात कम्युनिस्ट विचारवंतांना भेटून त्यांच्याशी मतभेदांच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात त्यांना नेहमीच आनंद होत असे.स्वामी विवेकानंद आणि कार्ल मार्क्स यांच्या जीवन आणि कार्यावरील त्यांची ‘मार्क्स आणि विवेकानंद’ या शीर्षकाची बौद्धिक मोहीम ही त्यांच्या अंतर्दृष्टीची आणि अभिव्यक्तीच्या स्पष्टतेचे उत्कृष्ट उदाहरण आहे.त्यांच्या 'श्री नारायण गुरु – दि प्रॉफेट ऑफ रिनाईझान्स', 'फ्रॉम मार्क्स टू महर्षी', 'ऑरबिंदो - दि प्रॉफेट ऑफ फ्यूचर', 'दि चेंजिग सोसायटी अँड दि चेंजलेस वॅल्यूज' आदी पुस्तकांतून त्यांची राष्ट्रीय चेतनेतील गहन बैठक आणि राष्ट्रीय पुनर्रचनेच्या कार्यासाठीची कटिबद्धता दिसून येते.केरळ मॉडेल या संकल्पनेतील फोलपणा उघडकीस आणण्यात ते काळाच्या पुढे होते आणि त्यांचेच मत नंतर प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांनी मांडले.स्वामी विवेकानंद यांच्या जीवन व कार्यावरील त्यांच्या सखोल विद्वत्तेची नोंद घेऊन त्यांना १९९३ मध्ये स्वामी विवेकानंदांच्या शिकागोतील भाषणाच्या शताब्दी सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राचे ते अध्यक्षही होते.हनुमान प्रसाद पोद्दार पुरस्कार, कोलकाता (1997), माता अमृतानंदमयी मठातर्फे दिला जाणारा अमृता कीर्ति पुरस्कार, (2002) आणि हिंदू रिनाईझान्स ॲवार्ड (2010) हे परमेश्वरजींना मिळालेले काही प्रमुख पुरस्कार होत. या सर्वांवर राष्ट्रीय पुनर्रचनेबद्दलचा त्यांचा उत्साह आणि अविरत प्रयत्न यांची नोंद घेत राष्ट्राने त्यांना २००४ मध्ये पद्मश्री आणि २०१८ मध्ये दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण देऊन सन्मानित केले.२०२० : पद्मविभूषण पी. परमेश्वरन यांचे निधन.* घटना :१७१४: छत्रपती शाहू महाराज (सातारा गादी) आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्यात वळवंड (लोणावळा) येथे तह झाला.१८४९: रोमन प्रजासत्ताकची रचना करण्यात आली.१८९९: रँडचा खून करण्यार्या चाफेकर बंधूंची नावे इंग्रज सरकारला सांगणार्या गणेश शंकर द्रविड व रामचंद्र शंकर द्रविड या बंधूंचा वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या झाडून वध केला.१९३१: महादेव विठ्ठल काळे यांनी आत्मोद्धार नावाचे पाक्षिक सुरू केले.१९३६: १६ सप्टेंबर १९३५ रोजी नोंदणी झालेल्या बँक ऑफ महाराष्ट्र चे कामकाज सुरू झाले.१९४२: दुसरे महायुद्ध – जपानने सिंगापूर ताब्यात घेतले.१९७१: NASDAQ हा अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक सुरू झाला.१९९४ – भारतीय गोलंदाज कपिलदेव निखंज यांनी ४३२ बळींचा जागतिक विक्रम केला.* जन्म : १८४४: भाषांतरकार गोविंद शंकरशास्त्री बापट यांचा जन्म.१९०९: तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य प्रा. केशव विष्णू तथा बाबा बेलसरे यांचा जन्म. (मृत्यू: ३ जानेवारी १९९८)१९२५: शास्त्रीय गायिका शोभा गुर्टू यांचा जन्म. (मृत्यू: २७ सप्टेंबर २००४)१९४१: गझलगायक जगजीतसिंग यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑक्टोबर २०११)१९६३: भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद अजहरुद्दीन यांचा जन्म.• मृत्यू : • १९२७: ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर१८४९)• १९७१: मुंबईचे पहिले गृहमंत्री, हैदराबाद संस्थानात भारत सरकारचे एंजट जनरल, नामवंत साहित्यिक आणि भारतीय विद्याभवन चे संस्थापक डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी यांचे निधन. (जन्म: ३० डिसेंबर १८८७)• १९९४: ख्यातनाम चित्रकार गोपाळराव देऊसकर यांचे निधन.• १९९४: कवी, कोशकार, इतिहास संशोधक, इतिहास लेखक, शाहिरी वाङ्मयाचे संग्राहक, संपादक व प्रकाशक यशवंत नरसिंह केळकर यांचे निधन. (जन्म: १९ जुलै १९०२)• १९९५: भारताचे माजी नौदलप्रमुख, व्हाईस अॅडमिरल भास्करराव सोमण यांचे निधन.• १९९९: आनंदग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका डॉ. इंदुताई पटवर्धन यांचे निधन. (जन्म: १४ मे १९२६)• २०२० : प्रसिद्ध उद्योगपती आणि चितळे उद्योग समूहाचे संचालक काकासाहेब चितळे ( दत्तात्रय ) यांचे निधन.